S M L

फरीदा जलाल यांच्या मृत्यूची अफवा

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 04:01 PM IST

फरीदा जलाल यांच्या मृत्यूची अफवा

20 फेब्रुवारी : बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या मृत्यूची बातमी अचानक सोशल मीडियावर वायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लोकांनीसुध्दा काहीही शहानिशा न करता त्यांना श्रध्दांजलीसुध्दा वाहिली. रविवारी सकाळी सुरु झालेल्या या अफवांमुळे दिवसभर त्यांच्या घरी लोकांची विचारपुस आणि येणं-जाणं सुरू झालं.

याआधीसुध्दा सोशल मीडियावर अशा अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. शेवटी खुद्द फरीदा यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या अफवा थांबल्या. सुरुवातीला त्यांनी हा विषय गंमतीने घेतला मात्र नंतर लोकांची विचारपुस वाढल्यानंतर त्यांना हे स्पष्टीकरण द्यावं लागलं.

याआधी अमिताभ बच्चन, हनी सिंग, राजेश खन्ना, माधुरी दीक्षित, दिलीप कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याविषयी अशा विचित्र बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. फरीदा यांनी आतापर्यंत आपल्या अभिनयाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपट, मालिका आणि जाहिराती गाजवल्या. त्यांना आपल्या भूमिकांसाठी अनेकदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close