S M L

अंधेरी स्थानकात घुसली कार,सुदैवानं कुणी जखमी नाही

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 01:57 PM IST

अंधेरी स्थानकात घुसली कार,सुदैवानं कुणी जखमी नाही

car

20 फेब्रुवारी : मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकात चक्क कार घुसली आणि ही कार फलाटावर आली.जिथे ट्रेन येते त्याच्या अगदी जवळ.

ह्युंदाई व्हर्ना कार आज सकाळी सव्वा सातच्या सुमाराला अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली.पोलिसांनी चालकाला पकडलंय.हरमीत सिंग असं त्याचं नाव आहे.तो अंडर १९ क्रिकेट खेळाडू आहे, असंही समजतंय. महत्त्वाचं म्हणजे सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही.

याआधीही अंधेरीच्या याच स्थानकात कार घुसली होती.आपल्या देशातले कार चालक कोणत्या धुंदीत गाडी चालवत असतात, हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय.इतकं मोठं रेल्वे स्थानक, त्याचा फलाट दिसत कसा नाही, हेच कळायला मार्ग नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close