S M L

बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2017 12:35 PM IST

बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

18 फेब्रुवारी : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकरांनी मतदान चालू असताना भाजप उमेदवाराच्या पतीला घेऊन बूथमध्ये प्रवेश केला होता. यावेळी केंद्रावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. राष्ट्रवादीने याबाबत मतदान अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर निवडणूक मतदान केंद्र अध्यक्षांच्या फिर्यादीवरून, मंठा पोलीस ठाण्यात लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close