S M L

मनोज तिवारींच्या गाडीची तोडफोड,प्रचार बंदीची धमकी

Sonali Deshpande | Updated On: Feb 17, 2017 11:01 AM IST

मनोज तिवारींच्या गाडीची तोडफोड,प्रचार बंदीची धमकी

17 फेब्रुवारी : सुप्रिसिद्ध गायक अभिनेते आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय.त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

तोडफोड करणाऱ्या व्यक्तीने त्यासोबत त्यांना एक धमकीचं पत्र देखील दिलं आहे.ज्यात असं लिहिलं आहे की मुंबईतला प्रचार बंद कर, नाहीतर ह्यावेळी गाडीचा काच फोडली आहे पुढल्या वेळी तोंड फोडीन.

घडलेल्या गोष्टीची माहिती मनोज यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे.त्यांनी ट्विटवर निषेध केला असून या प्ररणात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close