S M L

दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली कार अडकली

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2017 07:23 PM IST

दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली कार अडकली

15 फेब्रुवारी : मुंबईतील दादर येथील हिंदु कॉलनीमध्ये एका इमारतीचा भाग कोसळलाय. इमारतीच्या ढिगाराखाली कार दबली असून यात काही लोकं असल्याची भीती वर्तवण्यात आलीये.

हिंदु कॉलनी येथे अलकनंदा या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीचं तोडकाम सुरू होतं.  त्यामुळे इमारतीत कोणही नव्हतं.  मात्र तोडकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला तेव्हा खाली उभी असलेली गाडी ढिगारात दबली गेली. या गाडीत काही लोक असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगार उपसण्याचं काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close