S M L

नागपुरात गँगवार, कुख्यात गुंड लिटील सरदारवर गोळीबार

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 04:36 PM IST

नागपुरात गँगवार, कुख्यात गुंड लिटील सरदारवर गोळीबार

13 फेब्रुवारी : निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यव्यवस्था कायम राखण्यासाठी नागपूर पोलीस सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी कुख्यात गुंड लिटील सरदारवर दुसऱ्या टोळीतील कुख्यात गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

उत्तर नागपुरातील अशोकनगर परिसरातील लिटील सरदारचे कार्यालय आहे. या ठिकाणीच तोंडावर फडके बांधून आलेल्या हल्लेखोरांनी लिटील सरदारवर गोळीबार केला. दरम्यान या हल्लात लिटील सरदार जखमी झाला आहे आणि त्याला व्होकार्ट हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लिटील सरदार हा नागपूरचा कुख्यात गुंड असून महिन्याभऱ्यापूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. टोळीयुद्दातून लिटील सरदारवर हा हल्ला करण्यात आला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close