S M L

बांगलादेशचा धुव्वा उडवत विराटचा विजयी 'षटकार'

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 03:36 PM IST

बांगलादेशचा धुव्वा उडवत विराटचा विजयी 'षटकार'

13 फेब्रुवारी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात टीम इंडियाने 208 धावांनी विजय मिळवला आहे. बांग्लादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात जिंकताना विराट कोहलीने कर्णधार म्हणून सलग सहा टेस्ट सीरिज जिंकल्याचा विक्रम केला.

पाचव्या दिवशी 459 धावांच्या डोंगरांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण  संघ 100.3 षटकामध्ये 250 धावांवर गारद झाला. यात महमुदुल्लाहने 149 चेंडूमध्ये सर्वाधिक 64 धावा (7 चौकार) तर सौम्य सरकारने 66 बॉलात 42 (7 चौकार) धावा केल्या.

पहिल्या डावातील 204 धावांच्या खेळीमुळे विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. सोबतच त्याने सलग चार कसोटी सामन्यात चार द्विशतकं झळकवण्याचा विक्रमही केला. तर जडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. त्यांच्या फिरकीच्या जादुनेच बांग्लादेशला रोखून ठेवण्यात यश आलं.

 विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या टेस्ट सीरिज-

- श्रीलंका 2-1

- दक्षिण अफ्रीका 3-0

- वेस्टइंडीज 2-0

- न्यूजीलंड 3-0

- इंग्लंड 4-0

- बांगलादेश 1-0

विराट कोहलीची चार सीरिजमधील द्विशतकं-

वेस्ट इंडीज (200)

न्युझीलंड (211)

इंग्लंड (235)

बांग्लादेश (204)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close