S M L

विखे पाटलांना शह देण्यासाठी थोरातांनी काँग्रेसविरोधात उभे केले बंडखोर

Samruddha Bhambure | Updated On: Feb 12, 2017 10:43 PM IST

विखे पाटलांना शह देण्यासाठी थोरातांनी काँग्रेसविरोधात उभे केले बंडखोर

हरिश दिमोटे, अहमदनगर

12 फेब्रुवारी :  अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातच जुंपलीये. जोर्वे आणि आश्वी गटात थोरातांनी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात बंडखोर रिंगणात उतरवलेत. त्यामुळं थोरात आणि विखे पाटलांच्या संघर्षात काँग्रेसचं खच्चीकरण व्हायची वेळ आलीये.

महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये राजकीय पक्ष ऐकमेकांविरोधात लढत असताना नगरमध्ये मात्र काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष सुरु आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सामना सुरू झालाय. थोरातांचा जन्मगाव असलेल्या जोर्वे आणि आश्वी हा गट मतदारसंघ पुनर्रचनेत विखे पाटलांच्या गटात गेलाय. या गटातून विखे समर्थकांना उमेदवारी मिळाली. त्यामुळं चिडलेल्या थोरातांनी बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. यावरुन राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर जाहीर टीका केलीये.

विखे पाटील यांनी उमेदवार देताना विश्वासात घेतलं नाही म्हणून बंडखोर उभे  केल्याचा दावा थोरातांनी केलाय.

राज्यातल्या काँग्रेससाठी हा काळ आणि या निवडणुका अतिशय आव्हानात्मक आहे. या काळातच दोन दिग्गज ऐकमेकांचे पाय ओढण्यात ताकद व्यर्थ घालवत असल्यानं काँग्रेसचं काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close