S M L

तुमच्या का पोटात दुखतंय ?,हर्षवर्धन पाटलांचा पलटवार

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 06:28 PM IST

ajit_Dada_on_patil11 फेब्रुवारी : लोकशाहीमध्ये कुणाला निवडणूक लढायची आणि कुणाला नाही याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांच्या का पोटात दुखाला लागलंय असा प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिलं.

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्य़ा 75 वर्षांच्या आईलाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं केलं. अरं पठ्ठ्या, मला तुझं हे काही पटलं नाही जर उमेदवार नव्हते तर मला सांगायचं मी दिले असते अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली होती. त्याला आज हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय.

गावातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्या निवडणुकीला उभ्या आहेत. ही लोकशाही आहे इथं कुणाला निवडणूक लढायची आणि कुणाला नाही याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांच्या का पोटात दुखाला लागलंय हे कळतं नाही असा टोला पाटलांनी लगावला.

तसंच तुम्ही इतरांचं वय काढताय. मग आम्हालाही इतरांचं वय काढावं लागेल. पण नेहमीप्रमाणे इकडे आले की त्यांची जीभ घसरलेली असते. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close