S M L

मेट्रो-३ प्रकल्पासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला मुंबई हायकोर्टाची मनाई

Samruddha Bhambure | Updated On: Feb 10, 2017 10:49 AM IST

मेट्रो-३ प्रकल्पासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला मुंबई हायकोर्टाची मनाई

10 फेब्रुवारी : सीप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाकरिता होणाऱ्या तब्बल पाच हजार झाडांच्या कत्तल करायला मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. पर्यावरणाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असेल तर त्याकडे डोळेझाक करणे योग्य नाही, असे सुनावत पुढील आदेश येई पर्यंत एकाही झाडाला हात लावू नये, असं कोर्टाने एमएमआरडीए आणि पालिकेला बजावलं आहे.

त्यासोबतचं विकासकामे करताना पर्यावरणाची हानी कशी टाळता येईल, याचे भान नियोजनकर्त्यांनी ठेवावे, असा टोलाही कोर्टाने यावेळी हाणला.

या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या पाच हजार झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत चर्चगेट येथील रहिवाशांनी त्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे या निर्णयाचा खोडा आता मेट्रो तीनच्या कामात आल्याने मेट्रोचं काम सुरू  व्हायला विलंब लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close