S M L

भाजप उमेदवार पराग शहांची संपत्ती 690कोटींची

Sonali Deshpande | Updated On: Feb 9, 2017 12:10 PM IST

भाजप उमेदवार पराग शहांची संपत्ती 690कोटींची

09 फेब्रुवारी : मुंबईतल्या घाटकोपरच्या गरोडीयानगरमधील वॉर्ड क्रमांक 132चे भाजपचे उमेदवार पराग शहा यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकलंय.कारण त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या शपथपत्रात स्वत:ची संपूर्ण संपत्ती 690 कोटी असल्याचं जाहीर केलंय. यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीचाही समावेश आहे.

त्याच्या संपत्तीचे आकडे बघून अनेकांना फक्त भोवळ यायची शिल्लक राहिलीय. मात्र शहा यांचा याबाबतचा तर्क मात्र वेगळा आहे. श्रीमंत असल्यामुळेच आपण लोकांची कामं निस्वार्थीपणे करू शकतो असं त्यांना वाटतंय.

पराग शहांच्या संपत्तीवर टाकूया एक नजर -

एकूण संपत्ती -690 कोटी

स्वतःच्या नावावर - 397 कोटी

पत्नीच्या नावावर - 248 कोटी

मुलं - 44 कोटी

रोख पैसे आणि बँक बॅलन्स - 5 कोटी

शेअर्स आणि बाँडस् - 542 कोटी

पीएफ आणि इन्शुरन्स - 119 कोटी

दागिने - 2 कोटी

गाड्या - 45 लाख

शेतजमीन -21 लाख

बिगर शेतीजमीन - 74 लाख

व्यावसायिक इमारत - 72 लाख

निवासस्थान - 17 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close