S M L

पाचशे रुपयांसाठी मुलाने केली बापाची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 09:20 PM IST

पाचशे रुपयांसाठी मुलाने केली बापाची निर्घृण हत्या

07 फेब्रुवारी : पाचशे रुपयांसाठी मुलानं आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियातल्या चुलोद गावात ही घटना घडलीय.

गोंदियाच्या चुलोद गावात राहणाऱ्या डोमनु मेश्राम ७० वर्षीय वृद्धाने आपल्या शेतातील एक झाड ५०० रुपयात विक्री केले असून वडिलाने मला न विचारता शेतातील झाड का विक्री केले आणि विक्री केले तर मला ५०० रुपये का दिले नाही याचा राग मनात धरून ४५ वर्षीय रेवतीलाल मेश्राम या मुलाने दुपारी झोपेत असलेल्या ७० वर्षीय वडिलांवर लाकडी काठीने वार करून वडिलांची निर्घृण हत्या केली.

सुरुवातीला हे प्रकरण दडपण्यासाठी मेश्राम कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र जेव्हा गावकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाल्यानं पोलिसांनी आरोपी मुलगा रेवतीलाल याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close