S M L

16 हजाराची लाच घेताना शिवसेना नगरसेविकेला रंगेहात पकडलं

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 08:38 PM IST

16 हजाराची लाच घेताना शिवसेना नगरसेविकेला रंगेहात पकडलं

07 फेब्रुवारी : मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नगरसेविका हेमांगी चेंबुरकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अटक केलीय. 16 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलीये.

हेमांगी चेंबुरकर या लालबाग परिसरातील नगरसेविका आहेत. त्यांना 16 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. त्या 55 वर्षाच्या असून त्यांच्यासह त्याच्या पीएला ही अटक करण्यात आलं आहे. हेमांगी चेंबुरकर यांनी एका हॉटेल व्यावसायिकाला 25 हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी 15 हजार देण्याचे ठरले होते. त्यात ही 1 हजार रुपये त्यांनी त्यांच्या पीएसाठी मागितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close