S M L

भाजपमध्ये या, मुख्यमंत्र्यांकडून अॅाफर; नवनीत राणांचा गौप्यस्फोट

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 06:35 PM IST

भाजपमध्ये या, मुख्यमंत्र्यांकडून अॅाफर; नवनीत राणांचा गौप्यस्फोट

23 जानेवारी : आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते भाजपमध्ये येण्याची ऑफर देतायेत असा गौप्यस्फोट अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी केला.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर  लोकसभा निवडणूक लढलेल्या,अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीवर नाराज आहेत.2 महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खुद्द शरद पवार आले होते, त्यावेळेस नवनीत राणा यांना मात्र डावलण्यात आले होते. स्थानिक नेत्यांमुळे नवनीत राणा नाराज असल्याचं समजतं. त्यांना मुख्यमंत्री आणि भाजप नेते भाजप मध्ये येण्याची ऑफर देत असल्याचे खुद्द नवनीत राणा यांनी सांगितलंय. त्यामुळे नवनीत राणा भाजपात जाणार का अशी सध्या चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close