S M L

भाजपने अवास्तव मागणी करू नये -गजानन कीर्तीकर

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 07:28 PM IST

भाजपने अवास्तव मागणी करू नये -गजानन कीर्तीकर

20 जानेवारी : भाजपने शिवसेनेकडे जागांची अवास्तव मागणी करू नये, शिवसेना भाजपसाठी 60 ते 70 जागा सोडायला शिवसेना तयार आहे, असं शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय. भाजपला 114 जागा कशा देणार, असा सवाल त्यांनी केलाय.

भाजप -शिवसेनेची युती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केल्यामुळे युतीची चर्चा थांबलीय. भाजप नेते आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी गुरुवारी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते नाराज झाले आणि युतीची चर्चाच थांबवा, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.

त्यामुळे भाजपचा युतीचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीबद्दल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close