S M L

नव्या नोटांची 'नकल' करणं अशक्य -उर्जित पटेल

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2016 08:35 PM IST

नव्या नोटांची 'नकल' करणं अशक्य -उर्जित पटेल

27 नोव्हेंबर : नव्या 500 आणि 2000 च्या नोटांच्या खोट्या नोटा करता येणार नाहीत यासाठी सुरक्षेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत असा दावा रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी  केलाय. तसंच ग्राहकांची गैरसोय टाळायला रिझर्व्ह बँकेसोबतच देशभरातल्या बँकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू अशी ग्वाहीही पटेल यांनी दिली.

नोटाबंदीचा वाद संपता संपत नाहीये.  आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आज सांगितले. नोटाबंदीवर आरबीआयचं दररोज लक्ष असतं. जनतेचा त्रास कमी व्हावा म्हणून आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करतंय. बँकांकडील चलन साठ्यात मोठी वाढ झालीये. बँकांमधील व्यवहार लवकरात लवकर सुरळीत व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पटेल यांनी दिली.

तसंच नव्या नोटा जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता सरकारी टांकसाळी पूर्ण क्षमतेनं काम करतायत, जेणेकरुन जनतेला गरजेनुसार नव्या नोटा उपलब्ध होतील. सर्व बँका एखादं मिशन असल्यासारखं नव्या नोटा आपल्या बँकांच्या शाखांमध्ये आणि एटीएममध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या 500 आणि 2000 च्या नोटांच्या खोट्या नोटा करता येणार नाहीत यासाठी सुरक्षेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. लोकांनी डेबिट कार्डसारख्या पर्यायाचा वापर करावा जेणेकरुन आर्थिक व्यवहार स्वस्त आणि सोयीस्कर होतील असं आवाहनही पटेल यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2016 08:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close