S M L

पाळणाघरांची नोंदणी बंधनकारक, बीट मार्शलही करणार पाहणी

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2016 09:49 PM IST

पाळणाघरांची नोंदणी बंधनकारक, बीट मार्शलही करणार पाहणी

25 नोव्हेंबर : नवी मुंबईतल्या पाळणाघर मारहाण प्रकरणाची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. पाळणाघरांच्या संदर्भात त्यांनी काही आदेश दिलेत. पाळणाघरांची नोंदणी बंधनकारक आहे, असं त्यांनी म्हटलंय. पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बंधनकारक करण्यात आलेत. आता बीट मार्शल पाळणाघरांची पाहणी करतील.

खारघरमधील पाळणाघरात चिमुरड्यांना मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केलीये. पाळणाघरांची नोंदणी बंधनकारक असणार आहे शिवाय पाळणाघरात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलेत. या सीसीटीव्हीचे आऊटपूट पालकांना पाहता येणार आहे. पाळणाघरात काम करणा-या कर्मचा-यांची पार्श्वभूमीही तपासण्यात येणार आहे. शिवाय पोलिसांचे बीट मार्शल पाळणाघरांना रोज भेट देणार आहेत. तसंच कलम 144 अंतर्गत सगळ्या प्ले स्कूलची नोंदणी बंधनकारक करण्यात आलीय. त्यासोबतच कर्मचा-यांची गुन्हेगारी पाश्‍र्वभूमीही तपासण्यात येईल, असं पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2016 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close