S M L

पुन्हा राष्ट्रवादीला निवडून दिलं तर प्रतिकूल परिस्थिती येईल, मुनगंटीवारांची धमकी

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2016 07:23 PM IST

पुन्हा राष्ट्रवादीला निवडून दिलं तर प्रतिकूल परिस्थिती येईल, मुनगंटीवारांची धमकी

24 नोव्हेंबर : 27 तारखेला होणा-या हिंगोली नगरपालिका निवडणुकीत जर भाजप निवडून आले तर हिंगोलीसाठी अनुकूल परिस्थिती येईल आणि जर पुन्हा राष्ट्रवादी निवडून आली तर हिंगोलीकरासाठी प्रतिकूल परिस्थिती येईल अशी धमकीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना दिली.

नगर पालिकतेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. आप-आपल्या पक्षाचे प्रचार नेते मंडळी करत आहेत. यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे. हिंगोली येथे भाजप च्या प्रचाराला आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थ मंत्री यांनी भाषण केले. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांची हिंगोली येथील प्रचार सभेत जीभ घसरली. मुनगंटीवार यांनी मतदारांना संबोधित केले कि मतदारांना धमकी दिली अशीच चर्चा हिंगोलीत सध्या होत आहे.

27 तारखेला होणा-या हिंगोली नगरपालिका निवडणुकीत जर भाजप निवडून आले तर हिंगोलीसाठी अनुकूल परिस्थिती येईल आणि जर पुन्हा राष्ट्रवादी निवडून आली तर हिंगोलीकरासाठी प्रतिकूल परिस्थिती येईल अशी धमकी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली की काय? अशी चर्चा आहे. महाराष्ट्राचा मंत्री हे सर्वांसाठी मंत्री असतो मनात कोणताही द्वेष न ठेवता सर्वांचा विकास करण्याची जबादारी मंत्र्यांची असते . हिंगोलीच्या प्रचार सभेत भाजपला मतदान करा असं आवाहन केलं तर ठीक मात्र मुनगंटीवार यांनी मतदारांनाच धमकी दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2016 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close