S M L

देशभरात एकच हेल्पलाईन नंबर !

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2016 08:48 PM IST

देशभरात एकच हेल्पलाईन नंबर !

23 नोव्हेंबर : देशभरात लवकरच एकच आपात्कालीन नंबर असणार आहे. 112 हा क्रमांक आपात्कालीन क्रमांक म्हणून वापरला जाणार आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय.

सध्या पोलिसांसाठी शंभर, अग्निशमन दलासाठी 101 आणि रुग्णवाहिकेसाठी 102 क्रमांक आहे. पण आता अमेरिकेच्या धरतीवर भारतातही एकच नंबर असेल. कुठे आग लागली, किंवा अपघात झाला, कुणी बेपत्ता असेल.. किंवा घरात कुणाला ह्रदयविकाराचा झटका आला, तर नेमका कोणता नंबर लावू, ह्याचा विचार करण्यात अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य सरकारनं एक सल्लागार कंपनीही नेमली आहे. यासाठी किती मनुष्यबळ लागेल, विविध येत्रणांमध्ये अचून समन्वय कसं साधता येईल. आलेली माहिती योग्य त्या यंत्रणेकडे लगेच कशी जाईल, यावर ही कंपनी सरकारला सल्ला देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2016 08:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close