S M L

गोव्यात रंगतोय सिनेमांचा कार्निवल

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2016 04:47 PM IST

iffi_news18_21112016

23नोव्हेंबर : 47वा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अर्थात इफ्फीची सुरुवात गोव्याला झाली.देश-विदेशातील विविध चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी या फेस्टिवलमध्ये रसिकांना मिळणार आहे. 20 नोव्हेंबरला सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

इफ्फीची शानदार सुरुवात

या भव्य सोहळ्याचं उद्घाटन अजय देवगणच्या हस्ते करण्यात आलं. इफ्फीची सुरुवात झाली ती पोलंडचा सिनेमा 'आफ्टर इमेज'नं. हा सिनेमा सगळ्याच सिनेरसिकांना आवडला.

कोरियावर फोकस

इफ्फीमध्ये यावर्षी फोकस आहे कोरिया.सहा कोरियन चित्रपटांचा खजिना फेस्टिवलमध्ये पाहायला मिळेल.कोरियन फिल्मस्‌चे अनेक दिग्गज इफ्फीसाठी गोव्यात आलेत.इफ्फीचा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्डसुध्दा कोरियन दिग्दर्शक क्वान ताएक यांना देणार आहेत.कोरियाचा किम जी वुन यांचा 'द एज ऑफ शॅडोज' हा चित्रपट ऑस्करला पाठवला आहे.

iffi_news18_21112016a

पाकिस्तानी सिनेमे नाहीत

या फेस्टिवलला 88 देशांमधील 194 चित्रपट दाखवले जाणार आहेत.मात्र यात एकाही पाकिस्तानी चित्रपटाचा समावेश नाहीये.पाकिस्तानी कलाकारांसंदर्भात सुरु असलेले वाद पाहता इफ्फीचा हा पवित्रा फार महत्त्वाचा वाटतोय.महोत्सवाचे दिग्दर्शक सेथिल राजन याबाबत म्हणाले की ,आलेल्या दोन पाकिस्तानी चित्रपटांपैकी एकही या दर्जाचा न वाटल्याने त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

सर्वोत्कृष्ट स्पर्धा विभाग

सर्वोत्कृष्ट स्पर्धा विभागात जगभरातून 15 चित्रपट दाखवले जातील. पैकी  'सहज पथेर गप्पो' आणि संस्कृत सिनेमा 'इष्टी' या दोन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.या विभागात जगभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमांचा आनंद घेता येईल.

भारतीय पॅनोरमाचा आस्वाद

भारतीय पॅनोरमा हा विभाग नेहमीच भारतीय चित्रपटांचा आरसा मानला जातो. गेल्या वर्षभरात बनत असलेले उत्कृष्ट सिनेमे या विभागात दाखवले जातात.या विभागात देशभरातून

आलेल्या 26 फिचर फिल्मस् आणि इतर 21 फिल्म्स दाखवल्या जातील.

अंधांसाठी विशेष सोय

केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाअंतर्गत यावर्षी इफ्फीने युनेस्को आणि एनजीओंसोबत केलेल्या उपक्रमाअंतर्गत तीन विशेष चित्रपट फक्त अंध आणि मूकबधीर व्यक्तींसाठी

दाखवले जाणार आहेत.त्यासाठी या चित्रपटांचा ऑडियोही उपलब्ध केला जाईल.

स्वच्छ भारत अभियान चित्रपट

राष्ट्रीय फिल्म विकास निगमने यावर्षी स्वच्छ भारत चित्रपट सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि त्यात दाखवलेल्या 20 चित्रपटांना या इफ्फीमध्ये स्थान मिळालंय.

iffi rain

अनेक विभागांचा समावेश

इतर अनेक लहान-मोठ्या विभागांचा समावेश या महोत्सवात आहे.काही ज्येष्ठ किंवा दिवंगत दिग्गजांचे चित्रपट एका विभागात दाखवले जाणार आहेत.त्यात ब्रिटिश चित्रपट निर्माते केन लोच,ऑस्ट्रियाचे फ्रिट्ज लॅग,हंगेरीचे विल्मोस सिगमंड,अमेरिकन स्टॅनले क्युब्रिक ,पोलंडच्या आंद्रे वाजदा आणि इराणी फिल्ममेकर अब्बास कियारोस्तामी यांचे चित्रपट दाखवले जातील.

वेगवेगळी वर्कशॉप्स

इफ्फीमध्ये होणारी वेगवेगळी वर्कशॉप्ससुध्दा या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असतात.जगभरातले चित्रपटक्षेत्रातले विविध दिग्गज इथे आपापले अनुभव आणि ज्ञान शेअर करतात.

आणि बरंच काही

इफ्फीसोबतच राष्ट्रीय फिल्म विकास निगम फिल्म बाजारचं आयोजन करतं.ज्यात देश-विदेशातील चित्रपटक्षेत्रांना समजून घेण्यासाठी आणि त्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.यात दररोज विविध चर्चासत्रं,वर्कशॉप्स, लाँचिंग पार्टी आयोजित केल्या जातात.

iffi war

पुरस्कारांसोबत होणार समारोप

यावर्षीच्या सोहळ्याच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे मगधीरा,मक्खी आणि बाहुबली इ.चित्रपटांचे दिग्दर्शक एम.एस.राजामौली असतील.यावर्षी विशेष सेंटिनरी पुरस्कारांची सुरुवात केली जाणार आहे. सुप्रसिध्द गायक एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांना '2016च्या भारतीय चित्रपट हस्ती' म्हणून सन्मानित केलं जाईल.आंतराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्तम चित्रपट,दिग्दर्शक,अभिनेता,अभिनेत्री आणि स्पेशल ज्युरी हे पुरस्कार दिले जातील.गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्फी शांती,सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटाला 'आयसीएफटी-युनेस्को गांधी मेडल' देऊन गौरवणार आहे.

सिनेमांच्या या कार्निवलला सुरुवात तर झालीय. आणि दिवसेंदिवस या महोत्सवाची रंगत वाढतच जाणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2016 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close