S M L

वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडू, अडसूळ यांचा इशारा

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2016 08:44 PM IST

 वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडू, अडसूळ यांचा इशारा

19 नोव्हेंबर : नोटाबंदीवरुन भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू आहे.  वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलाय.

जिल्हा सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आलीय. या मुद्द्यावरुन आनंदराव अडसूळ यांनी भाजपला इशाराच दिलाय. सहकारी बँका बंद करायचा निर्णय रिझर्व बँक आहे. पण सर्वसामान्यांना भाजी आणि फळ विक्रेता सरकारी बँकांमध्ये खाते उघडेल का ? असा प्रश्न  अडसूळ यांनी केलाय. सरकारनं ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अडसूळ हे लोकसभेत शिवसेना गटनेते आहेत. आणि सहकारी बँक कर्मचारी युनिअनचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे अडसूळ यांच्या या भूमिकेवर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2016 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close