S M L

तुकाराम मुंढेंचा शिवसेनेला दणका, सेनेच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2016 09:28 PM IST

तुकाराम मुंढेंचा शिवसेनेला दणका, सेनेच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द

mundhe_vs_sena 18 नोव्हेंबर : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिवसेनेला दणका दिलाय. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचं पद मुंढेंनी रद्द केलंय. शिवराम पाटील आणि अनिता पाटील अशी या नगरसेवकांची नावं आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.

शिवराम पाटील हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. साहजिकच शिवसेनेच्या हातून स्थायी समितीचं अध्यक्षपदही जाणार आहे. मुख्य म्हणजे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुकाराम मुंढेंची ही कारवाई फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आणखी 18 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर या प्रकरणी आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. आयुक्तांचा निर्णय आकसापोटी घेतला, त्यामुळे शिवसेना आयुक्तांना कोर्टात खेचणार आहे

विशेष म्हणजे, मुंढे यांच्या अविश्वास ठराव आणण्यामागे शिवराम पाटील यांची प्रमुख भूमिका होती. बड्या मुश्किलीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या खजिन्याच्या चाव्या शिवसेनेच्या ताब्यात आल्या होत्या. माञ आता शिवसेनेचा सभापतीसह दोन नगरसेवक बाद झाल्याने झाल्याने शिवसेनेला हातातली स्थायी समिती गमवावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2016 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close