S M L

सहकारमंत्र्यांच्या अडचणीत भर, लोकमंगलचा खुलासा निवडणूक आयोगाला अमान्य

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2016 04:30 PM IST

Subhasd deshkmsad

18 नोव्हेंबर :  लोकमंगलच्या सापडलेल्या कॅश प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुखांची अडचण चांगलीच वाढलीये. उमरग्यात सापडलेल्या 91 लाखांचं जे स्पष्टीकरण लोकमंगलनं दिलंय ते निवडणूक आयोगाने अमान्य केलं आहे.

उमरग्यामध्ये देशमुख यांच्या लोकमंगल समुहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. याबाबत 5 नोव्हेंबरला लोहारा, उमरगा शाखेवरुन सोलापूर शाखेला दिल्याचा खुलासा देशमुखांनी केला. पण नोटबंदीचा निर्णय तर 8 तारखेला आलाय. त्यानंतर आठ दिवसानं म्हणजे 16 तारखेला पैसे पकडले गेलेत. त्यामुळे एवढी मोठी रक्कम आठ दिवस लोकमंगलनं स्वत:कडे कशी काय ठेवली असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केला आहे.

तसंच 5 तारखेला पैसे निघाले तर 16  तरखेला पकडण्यात आलेल्या पैशांना पाय फुटून ते स्वत:च फिरत होते की काय?, असाही सवाल निर्माण होतोय.

याबाबत दिल्लीतील मुख्य रजिस्ट्रारकडून निवडणूक आयोग सगळी माहिती तपासून घेणार आहे. तसंच सहकार विभागाच्या उपनिबंधक यांच्याकडून थर्ड पार्टी ऑडीट केलं जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2016 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close