S M L

खऱ्या ‘रँचो’ला मानाचा रोलेक्स अॅवॉर्ड !

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2016 09:41 PM IST

 खऱ्या ‘रँचो’ला मानाचा रोलेक्स अॅवॉर्ड !

 

sonam wangchuk ladakh (6)18 नोव्हेंबर : 3 इडीयट्समधला 'ऑल इज वेल' म्हणणारा 'रँचो' तर तुम्हाला आठवतच असेल.आमिर खानची ही भूमिका लेहच्या ज्या ख-या इंजिनियरवर प्रेरित होती त्याला मानाच्या रोलेक्स ऍवॉर्डस् फॉर इंटरप्राईज 2016ने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवारी लॉस एंजिलस येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

50 वर्षीय सोनम वांगचुक हे लदाखी इंजिनियर असून त्यांनी स्थानिक पाणी प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशामुळे तेथे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी बर्फाचे स्तुप बनवून त्यात पाणी साठवले. त्यांना ह्या उपक्रमामुळे जागतिक ओळख मिळाली आहे. त्यांच्यासोबत इतर चार जणांनासुद्धा सन्मानित करण्यात आलंय.[wzslider]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2016 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close