S M L

बँकेत डाव्या नाहीतर उजव्या हाताच्या बोटावर शाई

Sachin Salve | Updated On: Nov 16, 2016 07:15 PM IST

बँकेत डाव्या नाहीतर उजव्या हाताच्या बोटावर शाई

16 नोव्हेंबर : बँकेत नोटा बदली करण्यासाठी गेलेल्या लोकांच्या उजव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तर निवडणुकीत मतदान करणा-या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली. बँकांमध्ये हातावर शाई लावण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर शाई नेमक्या कोणत्या बोटाला लावणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावर निवडणूक आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी असे आदेशही जे.एस . सहारिया यांनी आज दिले. नाशिक विभागातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

निवडणुकांसाठी डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला शाई लावली जाते , शासनाने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद केलेल्या आहेत त्यासाठी केंद्र शासनाने कालच घोषणा केली आहे. बँकेतून पैसे काढताना कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये, यासाठी आता बँकेमध्ये शाई लावली जाणार आहे. केंद्र शासनाला निवडणूक आयोगाने विनंती केली होती की डाव्या हाताला शाई लावू नये तर ती उजव्या हाताला लावली जावी, डाव्या हाताला लावली जाणारी शाई ही फक्त निवडणुकांसाठीच असावी हे म्हणणे शासनाने मान्य केले असून, आता उजव्या हाताला नोटा बदलण्यासाठी शाई लावण्यात येईल अशी माहिती सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close