S M L

मोदींच्या पवार प्रेमानंतर सेनेनंही दिले 'दीदी'गिरीचे संकेत

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2016 04:51 PM IST

मोदींच्या पवार प्रेमानंतर सेनेनंही दिले 'दीदी'गिरीचे संकेत

15 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्यामुळे राजकारणाच्या सारीपाटावर गोंधळ उडालाय. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनंही याचा धस्का घेत 'दीदी'गिरी सुरू करण्याचे संकेत दिलेय. जर मोदींना शरद पवार चालू शकतात तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.

नोटाबंदीविरोधात शिवसेनेने मैदानात उतरण्याची तयारी चालवलीये. यासंदर्भात शिवसेना विरोधी पक्षांच्या तसंच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. देशात आर्थिक अराजक निर्माण झालंय आणि यासंदर्भात सगळ्यांचे दरवाजे ठोठावण्याची आपली तयारी असल्याचं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलंय.

आज मातोश्रीवर सेनेच्या झालेल्या बैठकीत जर मोदींना शरद पवार चालू शकतात तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? ममता बॅनजीर्ंसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? असा सवालच उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती केला. तसंच आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो असे संकेतही उद्धव ठाकरेंनी दिले.

तसंच रिझर्व्ह बँकेनं नोटा स्वीकारण्यासाठी जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्वसामान्य शेतक-याचा पैसा जिल्हा बँकेत आहे. शेतक-यांची अडवणूक कशासाठी करता. जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी उद्या पंतप्रधानांना निवेदन द्या असे आदेशही उद्धव ठाकरेंनी खासदारांना दिले. तसंच या प्रश्नी स्वतः मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close