S M L

माओवादी अडकले आर्थिक खिंडीत, 7.5 हजार कोटी असल्याचा संशय

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2016 07:58 PM IST

माओवादी अडकले आर्थिक खिंडीत, 7.5 हजार कोटी असल्याचा संशय

14 नोव्हेंबर : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे देशभरातल्या माओवाद्यांना दणका बसलाय. माओवाद्यांकडे सुमारे साडेसात हजार कोटी रुपये असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र केलीय. दंडकारण्यामध्ये माओवाद्यांनी दडवून ठेवलेली रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याचा दावा बस्तरच्या आयजींनी केलाय.

गडचिरोली, बस्तर, ओडिशामधलं मलकानगिरी, तेलंगणा या भागांत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या या डंपिंगच्या विरोधात कारवाई सुरू केलीय. साडेसात हजार कोटी रुपये पूर्णपणे वाया गेल्यामुळे आता या नोटा चलनात आणण्यासाठी माओवादी प्रयत्न करतायत. पण हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी माओवाद्यांची कोंडी करायचं ठरवलंय. माओवादी त्यांच्या कट्टर पाठीराख्यांकडून या नोटा बदलूनही घेऊ शकतात. पण तरीही नोटीबंदीच्या निर्णयामुळे सध्यातरी माओवाद्यांची पूर्णपणे कोंडी झालीय.

माओवाद्यांना दरवर्षी 1 हजार कोटींची रक्कम मिळते, असा अंदाज आहे. खाणउद्योग, तेंदूपत्ता ठेकेदार, बांधकाम कंत्राटदार यासारख्या घटकांकडून ते खंडणी वसूल करतात. ही सगळी रक्कम नोटांच्या स्वरूपातच असते. पण नोटाबंदीच्या कारवाईमुळे माओवादी चळवळीच्या आथिर्क नाड्या चांगल्याच आवळल्या गेल्यायत. गडचिरोलीमध्ये सगळ्या बँका आणि ATM सेंटर्सवरही पोलिसांची करडी नजर आहे. माओवादी आपल्याकडे दडवून ठेवलेला पैसा दुसर्‍यांच्या खात्यात भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस सगळी खबरदारी घेतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close