S M L

मोदींमुळे देशात आर्थिक अराजकाचा स्फोट - शिवसेना

Samruddha Bhambure | Updated On: Nov 14, 2016 11:19 AM IST

uddhav on modi_land_bill

14 नोव्हेंबर :   मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतो, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर, या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय?, असा सवालही उपस्थित केला आहे.  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे तोंडभरून कौतुक होताना दिसत आहे. देशातला काळा पैसा, बेहिशेबी संपत्ती खतम व्हायलाच पाहिजे! काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. पण मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक यादवी आली आहे’,अशी सडकून टीकाही करण्यात आली आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय?, असे अनेक सवाल अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत.

मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान परदेशात सतत फिरतात ते जनतेच्या कष्टाच्या पैशांवर आणि त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहून नोटा बदलाव्या लागलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं. नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या मनाची दशा समजून घेतली पाहिजे. त्यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला करायचे सोडून सवाशे कोटी जनतेवर हल्ला केला, त्यांना घायाळ केलंय, रांगेत उभं करून मारले आणि त्या हतबल लोकांना ‘शूर’ ठरवून त्यांना सॅल्यूट केलं, अशी खोचक टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close