S M L

नव्या नोटांना लाचखोरीची बाधा, लाचखोर अधिकारी अटकेत

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 09:08 PM IST

नव्या नोटांना लाचखोरीची बाधा, लाचखोर अधिकारी अटकेत

कोल्हापूर, 12 नोव्हेंबर : जुन्या नोटा बाद केल्याने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असं वाटत असतानात कोल्हापुरात या नव्या नोटांनी लाच दिल्याची बातमी पुढे आलीये. 2 हजाराचा 17 असे 35 हजाराची लाच स्वीकारता लाचखोर अधिकारी आयकर विभागाच्या जाळ्यात अडकलाय.

35 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीये.

शाळेतील मुख्याध्यापकाच्या नेमणूक पत्र देण्यासाठी एकनाथ सावर्डेकर याने 35 हजारांची लाच स्वीकारली. लाचेच्या रक्कमेत नव्या 2 हजाराच्या 17 नोटांचा समावेश होता. नव्या नोटांचा लाचखोरीचा राज्यात हा पहिला बळी ठरलाय. विशेष म्हणजे अजूनही बँकेत 2 हजाराच्या नोटा देण्याचं सुरू आहे. नव्या नोटांची नवलाई अजून संपत नाही तीच लाचखोरीची बाधा झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2016 08:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close