S M L

एकाच दिवसात रेल्वेची 1.80 कोटीची तिकीट बुक, 12 तारखेपासून एसी तिकीट रिझर्वेशन बंदी

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2016 06:13 PM IST

एकाच दिवसात रेल्वेची 1.80 कोटीची तिकीट बुक, 12 तारखेपासून एसी तिकीट रिझर्वेशन बंदी

10 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा वाचवण्यासाठी लोकांनी रेल्वे तिकीट बुक करण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे अवघ्या एका दिवसात 1 कोटी 80 लाखांचे तिकीट बुक झाले. पण आता 12 तारखेनंतर रिझर्वेशन बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. त्यामुळे तिकीट विंडोहुन होणारं बुकिंग लवकरच बंद केलं जाणार आहे.

500 आणि 1000 रूपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर रेल्वेत मात्र या नोटा स्विकारल्या जात होत्या. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक जणांनी काल रातोरात ठिकाठिकाणची एसी फर्स्ट क्लासची ऍडव्हान्स बुकिंग केली. त्यामुळे अवघ्या एका दिवसात 1 कोटी 80 लाख रूपयांची तिकीट बुकिंग झाली. त्यामुळे या गोष्टीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अखेर यावर बंदी घातलीये. त्यासोबतच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कमेचं तिकिट बुकिंग करायचं असल्यास पॅन कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2016 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close