S M L

ज्यांनी कष्टाने पैसा कमावलाय त्यांनी घाबरु नये - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2016 12:39 PM IST

cm_devendra_phadanvis4

09 नोव्हेंबर :  देशातील भ्रष्टाचाराला उखडून काढण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे या लढाईमध्ये एका सच्चा सैनिकाप्रमाणे जनतेने काळ्यापैशाच्या विरोधात सरकारला साथ द्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ज्यांनी कष्टाने पैसा कमावलाय त्यांनी घाबरु नये.  मोदींनी काळ्यापैशाविरोधात घेतलेला हा निर्णय देशाच्या विकासासाठी एक एतिहासिक ठरेल, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काळ्यापैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाचशे आणि हजारच्या नोटा हद्दपार केल्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधाच्या लढाईमध्ये सहभागी होऊन पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.

कायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा कोठेही वाया जाणार नाही. सरकारने चलनातून हद्दपार केलेल्या नोटा बदलण्यासाठी योग्य अवधी दिलेला आहे. त्यामुळे गोंधळ गडबड करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, काळ्यापैशावर लगाम घालण्यासाठी मोदींनी घेतलेल्या निर्णयानंतर राजकिय क्षेत्रातुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींच्या या निर्णयाला सर्जिकल स्ट्राईकची उपमा दिली आहे. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराविरोधी सर्जिक स्ट्राईक केले. असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close