S M L

बॉलिवूडचं समर्थन हिलरी क्लिंटनना

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2016 01:24 PM IST

बॉलिवूडचं समर्थन हिलरी क्लिंटनना

 salman-khan-1478360077

08नोव्हेंबर: आज सगळ्यांचं लक्ष लागलंय ते अमेरिकन निवडणुकीकडे. त्यात बॉलिवूड स्टार्सही दूर नाहीयत. अनेक जण हिलरी क्लिंटननाच पाठिंबा दाखवतायत.

सलमान खान आणि कबीर बेदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटनना समर्थन दिलंय. ऋषी कपूरनंही हिलरी क्लिंटननाच पाठिंबा दर्शवलाय.

ऋषी कपूरनं ट्विट करत म्हटलंय,' तुम्हाला शांती,स्थैर्य आणि समाधान हवं असेल तर हिलरींनाच निवडून द्या. डोनाल्ड ट्रंप हा पर्याय असूच शकत नाही,' असं म्हणून ऋषी कपूरनं हिलरींना शुभेच्छा दिल्यात.

सलमान खाननंही हिलरींचं समर्थन करत ट्विट केलंय.तो म्हणतो, 'मला आशा वाटतेय की तुम्ही जिंकाल.देव तुम्हाला संविधान आणि माणुसकीच्या मूल्यांचं पालन करण्याची ताकद देवो.ऑल द बेस्ट.'

अभिनेता कबीर बेदीनंही हिलरी क्लिंटनच्या विजयाची इच्छा व्यक्त केलीय. त्यानं म्हटलंय की, अमेरिकेत एक महिला राष्ट्रपती होणं, ही मोठी ऐतिहासिक घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close