S M L

शहीद राजेंद्र तुपारेंवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2016 12:10 PM IST

शहीद राजेंद्र तुपारेंवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

shahid12323

08 नोव्हेंबर : पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील हजारो ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात राजेंद्र तुपारे शहीद झाले होते.  तुपारे यांनी आपली 14 वर्षे भारतमातेच्या सेवेसाठी घालवली. त्यांच्या सेवेची काही वर्षे बाकी असताना पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. तुपारे शहीद झाल्याचे बातमी येताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. आज सकाळपासूनच या वीरपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'भारत माता की जय, वंदे मातरम, राजेंद्र तुपारे अमर रहे' या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सैन्याच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तुपारे यांना मानवंदना दिली. तुपारेंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close