S M L

सदाभाऊ खोतांच्या निवासस्थानाबाहेर शेतकरी संघटनेचा ठिय्या

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2016 05:20 PM IST

सदाभाऊ खोतांच्या निवासस्थानाबाहेर शेतकरी संघटनेचा ठिय्या

07, नोव्हेंबर : सांगलीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर बळीराजा शेतकरी संघटना आणि सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलकांनी आता घरापासून शंभर मीटर अंतरावर धरणं आंदोलन सुरु केलंय.

ऊसाला 3500 रूपये दर द्यावा या मागणीसाठी आज बळीराजा संघटना मंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील घरा समोर आंदोलन करणार होते. मात्र आंदोलकाना पोलिसांनी घरापासून शंभर मीटर अंतरावर ऱोखलं. त्यामुळे आंदोलकांनी घरा पासून शंभर मीटर अंतरावर हे धरणं आंदोलन सुरू केले आहे. भजन कीर्तन करत हे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटना, सकल ऊस परिषद, किसान सभा, संभाजी ब्रिग्रेडचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

तर अंदोलनाच्या ठिकाणी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ऊसाला पस्तीसशे रुपये भाव देण्याची मागणी आंदोलकांनी केलीये. ऊसाला पस्तीसशे रुपये भाव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं सकल ऊस परिषदेनं जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2016 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close