S M L

सुनील तटकरेंचा पुतण्या शिवबंधनात

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2016 03:45 PM IST

सुनील तटकरेंचा पुतण्या शिवबंधनात

06 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या संदीप तटकरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत शिवसेना भवनात संदीप तटकरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधनाचा धागा हातावर बांधला.

रायगड जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झालीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती परंतु, ती नाकारल्याने संदीप तटकरे यांनी थेट शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

आज त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना भवनात आपल्या समर्थकांसह सुनील तटकरेंनी प्रवेश केला. आपण कधीही राष्ट्रवादीचे सदस्य नव्हतो. पदाधिकारी नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीशी आपला कधीही संबंध आला नसल्याचा दावा संदीप तटकरे यांनी केला. रोह्याच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली मात्र सुनील तटकरेंनी दिली नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं संदीप यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2016 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close