S M L

इंदापूरच्या हिंगणगावात बिबट्याचा धुमाकूळ, 9 शेळ्या शिकार

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2016 07:26 PM IST

इंदापूरच्या हिंगणगावात बिबट्याचा धुमाकूळ, 9 शेळ्या शिकार

04 नोव्हेंबर : इंदापूर तालुक्यातील कांदलगाव हिंगणगाव परिसरात मागच्या चार-पाच दिवसांपासून बिबट्यानं धुमाकुळ घातलाय. मोठ्या प्रमाणात हा बिबट्या शेळ्यांना शिकार बनवतोय. आत्तापर्यंत बिबट्यानं 9 शेळ्यांना आपला शिकार बनवलाय.

हिंगणगाव हा परिसर उजनीच्या पाणलोट क्षेत्राचा आहे. या परिसरात हजारो एकर ऊस शेती असल्यानं इथे बिबट्यांना लपण्यासाठी मोठी जागा आहे. मागच्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात वावरत असल्याबाबदत लोकांना माहिती होती. पण गेल्या 4-5 दिवसांपासून या बिबट्यानं आता लोकवस्तीतील शेळ्यांना आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात आता ऊसतोड हंगाम सुरू झाला आहे. आणि त्यात या बिबट्याच्या वावरण्याने शेतकरीही हैराण झाले आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर तयार नाहीत. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर सापळा लावण्यात यावा अशी मागणी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close