S M L

अपयशाच्या भीतीतून मला स्फूर्ती मिळते- आलिया भट्ट

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2016 12:36 PM IST

अपयशाच्या भीतीतून मला स्फूर्ती मिळते- आलिया भट्ट

4 नोव्हेंबर: 25नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या 'डियर जिंदगी'चं प्रमोशन जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभिनेत्री आलिया भट्टनं तिच्या फॅन्सशी संवाद साधला. त्यावेळी तिनं अपयशातून आपण स्फूर्ती घेत असल्याचं सांगितलं.

'अपयशाच्या भीतीनं मी सारखी काम करत राहते. भीती वाटते म्हणूनच मला स्फूर्ती मिळते.'आलियानं आपल्या फॅन्सशी आपलं एक गुपित शेअर केलं.

एका फॅननं आलियाला विचारलं की तू तुझ्यावर झालेल्या टीकेकडे कसं पाहतेस? यावर आलिया म्हणाली,'प्रत्येकाला आपलं मत मांडायचा हक्क आहे. पण तुम्ही सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नसते. सकारात्मक राहा आणि तुम्ही कोण आहात,कसे आहात हे तुम्हाला ठाऊक आहे ना मग झालं तर!'

'डियर जिंदगी'चं दिग्दर्शन गौरी शिंदेनं केलंय. पहिल्यांदा 51वर्षांचा शाहरूख आणि आलिया एकत्र सिनेमात काम करतायत. आलिया किंग खानची फॅन आहे.शाहरूखचे 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'चक दे' सिनेमे आलियाला अतिशय आवडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close