S M L

शहीद विलास शिंदे खून प्रकरण : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवणार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2016 03:56 PM IST

Constable vilas shinde

04 नोव्हेंबर :   वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल शहीद विलास शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला  चालवण्यात येणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.

अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारने अल्पवयीन आरोपींसंदर्भातील कायद्यात बदल केला आहे. त्यानूसार बलात्कार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवता येतो.

शिंदे यांच्या मृत्यूचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडे दाद मागितली असता आरोपीवर ' सज्ञान' म्हमून खटला चालवण्याची परवानगी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close