S M L

फेरीवाल्यासोबत वाद जीवावर बेतला, लोकलखाली येऊन तरुणाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2016 11:34 PM IST

फेरीवाल्यासोबत वाद जीवावर बेतला, लोकलखाली येऊन तरुणाचा मृत्यू

03 ऑक्टोबर : ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या दादारगिरीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. फेरीवाल्यांना विरोध केला म्हणून त्यांनी एका 30 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने पळ काढला पण धावत्या लोकलखाली येऊन त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला.

ठाणे स्थानक परिसरात फेरीवाले आणि महानगर पालिका अतिक्रमन विभाग,नगर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांची अभद्र युती झालीय आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तर विरोध करणा-या मारहाण करण्यापर्यंत हा प्रकार जातोय.

27 ऑक्टोबरला अशाच एका प्रकरणात आसनगाव येथे राहणा-या राहुल मुसळे या तरुणाला जीव गमवावा लागला. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात त्याला फेरीवाल्यांनी त्याला बेदम मारहाण केलीय आणि या मारहाणीतून सुटका करण्याचा नादात पळून जाताना त्याचा ट्रेन खाली येऊन जीव गेलाय. या प्रकारानंतर त्याची अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय आणि त्याला झालेल्या मारहाणीचा प्रकार दडपण्यात आलाय.

दरम्यान, या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीमागे ठाणे स्थानक परिसरातील पंडित नावाचा गुंड असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही फेरीवाल्या गुंडांनी ठाणे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही पुरावे नष्ट करण्यासाठी तोडले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close