S M L

'व्हेंटिलेटर'ची निर्मिती केल्याचा अभिमान-प्रियांका चोप्रा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2016 11:50 AM IST

'व्हेंटिलेटर'ची निर्मिती केल्याचा अभिमान-प्रियांका चोप्रा

3 नोव्हेंबर: उद्या प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला 'व्हेंटिलेटर' रिलीज होतोय.प्रियांकानं ट्विट करून आपण मराठी सिनेमाची निर्मिती केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलंय.

'व्हेंटिलेटर हा माझा पहिला मराठी सिनेमा. आणि याचा मला अभिमान वाटतोय.कधी एकदा 4 नोव्हेंबर उजाडतोय असं मला झालंय.'प्रियांकानं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. या सिनेमात तिनं पाहुण्या कलाकाराचीही भूमिका साकारलीय.

या सिनेमातून आशुतोष गोवारीकरचा अभिनय पाहायला मिळणार आहे. प्रियांकानं सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय. त्यात 116 कलाकार आहेत.

'फेरारी की सवारी'चा दिग्दर्शक राजेश मापुस्करनं 'व्हेंटिलेटर'चं दिग्दर्शन आणि लेखन केलंय. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी एका कुटुंबातल्या वृद्ध व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. आणि त्याभोवतीच ही कथा फिरते. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close