S M L

वाद टाळण्यासाठीच राकेश मारियांची मुदतीपूर्वी उचलबांगडी,मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Samruddha Bhambure | Updated On: Nov 2, 2016 11:42 AM IST

वाद टाळण्यासाठीच राकेश मारियांची मुदतीपूर्वी उचलबांगडी,मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

 2 नोव्हेंबर: शीना बोरा हत्याप्रकरणी वाद टाळण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची मुदतीच्या पूर्वी उचलबांगडी केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्याची चर्चा मारियांबद्दल होतीच. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, त्यावेळी दोन-तीन वाद निर्माण झाले होते. ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्ही मान्य केलं. शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस घेतल्यामुळे पोलिस आयुक्त या केसमध्ये इतका रस का घेत आहेत, असे सवाल उपस्थित झाले.

मारियांना तपासकार्यात कुतूहल असतं, त्यामुळे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचा विचार करत आम्ही इतर शक्यता फेटाळून लावल्या, असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले की, मारियांना आम्ही बढती दिली, त्यांची ट्रान्सफर केली नाही. शीना बोरा हत्या प्रकरण सोडलं तर मारिया यांचं काम नेहमीच उत्तम राहिलंय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2016 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close