S M L

दरवेळी फक्त मुस्लिम कैदीच तुरुंगातून कसे पळतात? - दिग्विजय सिंह

Samruddha Bhambure | Updated On: Nov 1, 2016 04:50 PM IST

दरवेळी फक्त मुस्लिम कैदीच तुरुंगातून कसे पळतात? - दिग्विजय सिंह

Press Conference Of Congress Leader  Digvijay Singh

01 नोव्हेंबर : भोपाळमधील सशंयित दहशतवाद्यांच्या एन्काउंटरवरून राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक सुरू असतानाच, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी या विषयाला वेगळंच वळण दिलं आहे. दरवेळी फक्त मुस्लिम कैदीच तुरुंगातून कसे काय पळतात?, हिंदू कैदी कसे पळत नाहीत?, असा सवाल अपस्थित केला आहे.

दिवाळीच्या रात्री संपूर्ण देश उत्सावात मग्न असताना भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगात असलेले सीमीचे आठ दहशतवादी रविवारी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश पोलिसांनी या आठही अतिरेक्‍यांना घेरले आणि त्यात ते सर्वजण ठार झाले. या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. 'सीमी'चे दहशतवादी पळून जाण्याबाबतची गोपनीय माहिती असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनआयए) किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडून या प्रकरणाची सत्य लपवून न ठेवता सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच "मी जर काही चूक बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कारवाई करावे‘, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, "दिग्विजयसिंह यांनी अलिकडेच बाटला हाऊस चकमकीबद्दल प्रश्‍न उपस्थित केले होते आणि सोनिया गांधी यांनी त्यावेळी ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले होते.‘ तसेच "आता मला सोनिया गांधी यांना विचारावेसे वाटते की दिग्विजयसिंह जे बोलत आहेत ती कॉंग्रेसची भूमिका आहे का?‘, असेही पुढे म्हटले आहे.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2016 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close