S M L

...आणि अजितदादा पवारसाहेबांवरच घसरले

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2016 06:12 PM IST

...आणि अजितदादा पवारसाहेबांवरच घसरले

27 ऑक्टोबर : बोलण्याच्या बाबतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा फटकळ स्वभाव सर्वांनाच माहित आहे. पण याच बोलण्याच्या नादात अजित पवार चक्क थेट शरद पवारांवर घसरले. शरद पवारांना आपल्या कारकिर्दीत बारामतीत साधे आरटीओ कार्यालय सुरू करता आले नाही पण मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा लगेच सुरू केलं अशा 'साक्षात्कारच' अजित पवारांनी घडवून दिला. पण वेळीच आपली चूक लक्षात येताच लागलीच सावरले देखील.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तृत्व कौशल्य अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. उजनी धरणातील अपु•या पाणीसाठ्या बाबत मूत्र विसर्जन करून तो भरायचा का किंवा भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते या सारखे बेताल अन् बेलगाम वक्तव्य करून अजितदादांनी राज्यभर गदारोळ उडवून दिला होता. या वक्तव्यानंतर आपली जीभ घासणार नाही याची ते पूर्ण दक्षता घेत असतात.

पण अजितदादा पुन्हा एकदा घसरले आणि ते थेट पवारांसाहेबांबद्दलच बोलून बसले. काल अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत.े अजितदादा या मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी होते. विषय माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांनी आपल्या अकलूजसाठी केलेल्या योगदानाचा निघाला. विजयदादांच्या कार्याचे कौतुक करता करता अजितदादांच्या मी पणा आपसूक बाहेर पडला. ते म्हणाले शरद पवारसाहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांना बारामतीमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करता आले नाही मी उपमुख्यमंत्री झाल्यावर ते सुरू केले. पवार काकांवर नकळत आपण कडी केल्याचे लक्षात येताच अजितदादांनी प्रकरण मिश्कीलने घेतले आणि पत्रकारांना वाढवू नका असा सल्ला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close