S M L

टाटा उद्योगसमुहाविरोधात कॅव्हेट दाखल केली नाही -सायरस मिस्त्री

Sachin Salve | Updated On: Oct 25, 2016 11:34 PM IST

टाटा उद्योगसमुहाविरोधात कॅव्हेट दाखल केली नाही -सायरस मिस्त्री

25 ऑक्टोबर : टाटा उद्योगसमुहाच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सायरस मिस्त्रींनी टाटा उद्योगसमुहाविरोधात कोणतीही कॅव्हेट दाखल केलेली नाही असं सायरस मिस्त्रींच्या कार्यालयाने स्पष्ट केलंय. याआधी आपल्याविरुद्ध झालेल्या कारवाईबाबत मिस्त्रींनी राष्ट्रीय कंपनी लवादामध्ये कॅव्हेट दाखल केल्याचं वृत्त होतं. पण आता मिस्त्रींच्या कार्यालयाने याचा इन्कार केलाय.

टाटा उद्योगसमूहाने सायरस मिस्त्रीविरोधात मुंबई हायकोर्टात आणि राष्ट्रीय कंपनी लवादाकडे कॅव्हेट दाखल केली आहे. सायरस मिस्त्री यांनी त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर रतन टाटांविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे रतन टाटा, टाटा उद्योगसमूह आणि आणि दोराबजी टाटा यांच्याविरोधात ही कॅव्हेट दाखल झाल्याचं कॅव्हेट वृत्त होतं. अत्यंत सचोटीने व्यवहार करणाया टाटा उद्योगसमूहामध्ये चेअरमन झाल्यावर सायरस मिस्त्रींची काम करण्याची पद्धत टाटा सन्समध्ये शेअर्स असणाया ट्रस्टना न आवडल्याने सायरस मिस्त्रींची हकालपट्टी करण्यात आलीये. आता यावरून न्यायालयीन लढाई सुरू होण्याची चिन्हं आहेत.

टाटा समूह आणि सायरस मिस्त्रींमध्ये नक्की काय वाद ?

-'मिस्त्रींनी टाटा व्यवस्थापनाशी योग्य संवाद ठेवला नाही' असं टाटा समूहाचं म्हणणं आहे

-टाटा डोकोमो व्यवहाराविषयी मिस्त्रींच्या भूमिकेवरून टाटा समुहात नाराजी होती

-मिस्त्रींनी टाटा समूहाअंतर्गत निर्माण केलेल्या एक्झिक्युटिव्ह समितीविषयी नाराजी

ही समिती मिस्त्री यांनी आपलं प्रभावक्षेत्र निर्माण करण्यासाठी निर्माण केल्याची टाटा समुहात भावना

-टाटा समूहाच्या इंग्लंडमधल्या स्टील उद्योगाबाबत मिस्त्रींच्या निर्णयांना टाटा समुहात विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2016 11:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close