S M L

उसाला 3200 रुपयांची पहिली उचल द्या -राजू शेट्टी

Sachin Salve | Updated On: Oct 25, 2016 11:25 PM IST

raju shety45325 ऑक्टोबर : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 15 वी ऊस परिषद आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये झाली. यावेळी उसाला 3200 रूपयांची पहिली उचल मिळावी असी मागणी खासदार राजू शेट्टींनी केलीये.

उसाला 3200 रुपये उचल एकरकमी दिली जावी असं सांगताना यंदा एफआरपीपेक्षा जास्त रक्कम दिली जावी असंही शेट्टी म्हणाले. यंदाचा गाळप हंगाम हा येत्या 5 तारखेपासून सुरु होणार आहे. यावेळी ऊसदराचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. ऊस दराचं एक प्रकारे रणशिंगच या ऊस परिषदेतून फुंकलं गेलं. मंत्रिपद मिळाल्यानंतर स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी पहिल्यांदाच या परिषदेला हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2016 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close