S M L

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी तब्बल 20 कोटींचा सट्टा !

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2016 09:46 PM IST

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी तब्बल 20 कोटींचा सट्टा !

विनय म्हाञे, नवी मुंबई, 24 ऑक्टोबर : नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणारे, प्रशासनात पारदर्शकता आणणारे ऐवढच नव्हे दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणा-या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी थोडी थोजके नव्हे तब्बल 20 कोटींचा घोडेबाजार सुरू आहे.

tukaram_mundheनवी मुंबईमहानगरपलिकेतल्या भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुढेंनी कठोर भूमिका घेतल्यावर सगळेजण हादरले. मुंढेंना हटवण्याच्या हालचालींना आता वेग येऊन यासाठी आता घोडेबाजार सुरू झालाय आणि यासाठी तब्बल 20 कोटींहून जास्तीची बोली लागलीये. एरवी एकमेकांच्या विरोधात असणारे नवी मुंबईतले नेते यासाठी एकत्र आलेत. त्यांना शहरातले बिल्डर,भूमाफिया, शिक्षणसम्राट आणि पालिका ठेकेदारांचीही मदत मिळतेय मुंढेंच्या घोडेबाजाराला अप्रत्यक्षरीत्या दुजोरा दिलाय युतीच्या नेत्यांनी..

शहर कुठलंही असो...राजकीय दबावाला भीक न घालता भ्रष्टाचाराला चाप लावणारा अधिकारी आला की त्याच्या विरोधात सगळ्या पक्षांची एकी होते. मग शहराचा विकास, जनतेच्या समस्या या खुशाल खुंटीवर टांगल्या जातात. या सगळ्याची सरकार दरबारी कोणा दखल घेणार का असाच प्रश्न आता हताशपणे जनता विचारते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 09:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close