S M L

गोव्यात शिवसेना वेलिंगकरांसोबत,लवकरच युतीची घोषणा

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 10:04 PM IST

गोव्यात शिवसेना वेलिंगकरांसोबत,लवकरच युतीची घोषणा

22 ऑक्टोबर : गोव्यात शिवसेना आणि सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या युतीवर एकमत झालंय. सत्तेसाठी नव्हे तर गोव्याच्या संस्कृती रक्षणासाठी युती करणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सुभाष वेलिंगकरांनी स्पष्ट केलंय.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरएसएसमध्ये बंडखोरी करून बाहेर पडलेले सुभष वेलिंगकर याचंी भेट घेतली. पणजी इथल्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक पार पडली. वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षामंचची आणि शिवसेनेची अधिकृत युती लवकरच जाहीर होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, बैठकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे कपटी मित्रापेक्षा शत्रू बरे अशी टीका केली होती. वेलिंगकर यांनी संघाला रामराम ठोकून स्वत:चा पक्ष स्थापन केला. गोव्यातून संघ आणि भाजपला हद्दपार करणार असा पवित्रा वेलिंगकरांनी घेतलाय. त्यांना आता शिवसेनेनं साथ दिल्यामुळे राज्यात भाजप आणि युतीत काय परिणाम होता हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 06:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close