S M L

'सेव्ह तुकाराम', नवी मुंबईकर मुंढेंच्या पाठीशी

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 02:32 PM IST

'सेव्ह तुकाराम', नवी मुंबईकर मुंढेंच्या पाठीशी

22 ऑक्टोबर : नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध राजकारणी असा सामना रंगलाय. मात्र, नवीमुंबईकर कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. #SaveTukaram अशी मोहीम त्यांनी हाती घेतलीये.

नवी मुंबईत 10 हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्याच्या भीतीमुळे नगरसेवकांनी तुकाराम मुंढे हटवा मोहिम सुरू केलीये. मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची रणणीती आखण्यात आलीये. मात्र अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यावरून नवी मुंबई शिवसेनेतच फूट पडलीय. 38 पैकी फक्त 7 नगरसेवक मुंढेंच्या विरोधात आहेत. उरलेले सर्व नगरसेवक त्यांच्या बाजूनं आहेत. या 32 नगरसेवकांनी काल एक गुप्त बैठक घेतली, आणि त्यानंतर ते ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. भाजप मात्र पालिका आयुक्तांच्या बाजूनंच आहे.

दरम्यान, नवी मुंबईच्या काही नागरिकांनी सेव तुकाराम ही मोहीम सुरू केलीय. तुकाराम मुंढे यांचं काम चांगलंय, आणि आयुक्त म्हणून ते आम्हाला हवे आहेत, असं या नागरिकांचं म्हणणं आहे. पण येत्या मंगळवारी हा अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close