S M L

राम शिंदेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 1 जणाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 08:00 PM IST

 राम शिंदेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 1 जणाचा मृत्यू

 

07 मे : राज्याचे गृहराज्य मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले. श्रीरामपूर नेवासा रोडवर शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस पायलट गाडी आणि कारचा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झालाय. तर  8 जण जखमी झाले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज दुपारी श्रीरामपूर नेवासा रोडवर ताफ्यातील पोलीस गाडीची मारूती अल्टो कारला जोराची धडक झाली. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. स्वत :राम शिंदे यांनी जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 07:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close