S M L

मनसेनं फोर्स-2चं शुटिंग पाडलं बंद, परदेशी कलाकारांना घेतलं ताब्यात

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2016 08:40 PM IST

मनसेनं फोर्स-2चं शुटिंग पाडलं बंद, परदेशी कलाकारांना घेतलं ताब्यात

22 एप्रिल : टुरिस्ट व्हिसावर काम करणार्‍या कलाकारांचा मुद्दा उपस्थिती करत मनसे चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोर्स -2 सिनेमाचं शुटिंग बंद पाडलं. गोरेगावमध्ये या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. 30 ते 35 परदेशी कलाकारांना ताब्यात घेण्यात आलंय.

गोरेगावच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फोर्स -2 सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. या सिनेमात टुरिस्ट व्हिसावर परदेशी कलावंत काम करत असल्याचा दावा मनसेनं केला. त्यामुळे मनसेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचं शुटिंग बंद पाडलं. टुरिस्ट व्हिसा असेल तर काम कसे करता असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. 30 ते 35 कलाकारांना पोलिसांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे, या शुटिंगच्यावेळी जॉन अब्राहम आणि निर्माते विपुल शाह उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 08:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close